ही माझ्या पत्रकारितेची केवळ गोळाबेरीज नव्हे, तर मला अनेक प्रश्नांनी कसं डोळस भान निर्माण करून दिलं, त्याची मुशाफिरी आहे!
एके काळी पत्रकारिता हे अत्यंत जबाबदारीचं माध्यम होतं, पण नव्वदनंतर जागतिकीकरणाचा परिणाम या क्षेत्रावरही झाला. पत्रकारितेला एक ‘प्रॉडक्ट’ म्हणून बाजारपेठीय मूल्य आलं. या नवभांडवली व्यवस्थेमध्ये स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मालक लोकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पत्रकारांपासून ते संपादकांपर्यंत सर्वांचाच वापर करण्यास सुरुवात केली.......